प्रेमप्रकरणातून मित्राकडून मित्राचा चाकूने भोसकून खून !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यात प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मित्रानेच आपल्या अल्पवयीन मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना खांडगाव येथील कपालेश्वरच्या डोंगरावर घडली. प्रमोद संजय वाघ (वय १७, रा. तिगाव, ता. संगमनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 


Loading...
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की प्रमोद संजय वाघ हा तरुण तिगाव याठिकाणी आपल्या मामांकडे राहात होता. तो संगमनेर येथील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत होता. 

रोज तो एसटी बसने ये-जा करत होता. शनिवारी तो कॉलेजला जातो, असे सांगून घरातून निघाला. संध्याकाळ झाली तरी प्रमोद घरी आला नाही, म्हणून त्याचा शोध घेण्यात आला; पण तो कुठेच सापडला नाही. 


त्यानंतर आजोबा भिकाजी कारभारी सांगळे (वय ८२) यांनी तालुका पोलीस ठाण्यात प्रमोद हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तालुका पोलिसांनी सांगळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुद्ध  गुन्हा दाखल केला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.