शिवसेनेनी शिर्डीची जागा राखून दक्षिणेचीही जिंकावी - रामदास कदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेमध्येही खलबते सुरू झाली आहेत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी जिल्ह्यातील शिर्डी व दक्षिण मतदारसंघाचा आढावा घेतला. या वेळी शिर्डीची जागा ताब्यात ठेवून दक्षिणेची जागाही खेचून आणावी, अशा सूचना मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.


Loading...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. नगरच्या दौऱ्यात येणाऱ्या मंत्री महोदयांसह प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून हा विषय चर्चेला घेतला जात आहे. मंत्री कदम गुरुवारी नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.