करंजी घाटातील अपघातात नगरचा युवक ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोहटादेवीच्या दर्शनासाठी नगरहून निघालेल्या युवकांच्या मोटारसायकलला करंजी घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. या घटनेत मनोज संजय जोगदंड (वय २४, रा. भोसले आखाडा, बुरुडगाव रोड, अ.नगर) हे ठार झाले. 

Loading...
या घटनेत अन्य जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना नगर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नवरात्रौत्सवानिमित्ताने मोहटा येथील देवीच्या दर्शनासाठी मनोज संजय जोगदंड त्यांच्या मित्रासमवेत नगरहून मोटारसायकलद्वारे निघाले होते. बुधवारी रात्री त्यांची मोटार सायकल घसरुन झालेल्या अपघातात जोगदंड यांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात औषधोपचार चालू आहे. मनोज जोगदंड हे महानगरपालिकेत कंत्राटी कामगार कार्यरत होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.