नगर दक्षिण लोकसभा जागेचा आज होणार फैसला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यातील शिर्डी व नगर या लोकसभेच्या दोन्ही जागांपैकी कोणत्या काँग्रेसने कोणती जागा लढवायची, याचा फैसला शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) मुंबईत होणार आहे. 'राष्ट्रवादी'ने विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप व काँग्रेसने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांची नावे पुढे केली आहेत. 

Loading...
येत्या मार्च-एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक अपेक्षित मानली जात आहे. त्याआधी नगर महापालिकेचीही निवडणूक आहे. मात्र, राज्यस्तरीय नेत्यांकडून सध्या मनपाऐवजी लोकसभा निवडणुकीला विशेष महत्त्व दिले गेल्याने या दृष्टीने हालचाली गतिमान आहेत. दोन्ही काँग्रेसच्या याआधीच्या जागा वाटपात नगरला राष्ट्रवादी व शिर्डीत काँग्रेस असे सूत्र असले, तरी आता काँग्रेसने नगरची जागा मागितली आहे. मात्र, त्या बदल्यात शिर्डीची देण्याची तयारी दाखवलेली नाही. 

या पार्श्वभूमीवर मुंबईत शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राज्यातील लोकसभा जागांच्या वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचे खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे जिल्ह्याच्या सर्वपक्षीय राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.