बळजबरीने गुप्तांग कापून तरुणाला केलं तृतीयपंथी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महिलांचं रुप घेऊन जत्रेत काम करणे एका तरुणाला भलतेच महागात पडले. तृतीयपंथीयांनी या तरुणाचे अपहरण करून त्याचे गुप्तांग कापून त्याला आपल्यासारखं केल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडलीये.पीडित तरुण हा हरियाणा येथील सोहना येथील शिव काॅलनीत राहतोय. पीडित तरुण हा लहानपणापासून गावातील जत्रेत देखाव्यांमध्ये पार्वतीची भूमिका साकारायचा. त्याच्यावर तृतीयपंथीयांची नजर पडली.
Loading...

तृतीयपंथीयांनी या तरुणाचं अपहरण केलं. जेव्हा आपला मुलाचं अपहरण झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळाली तेव्हा त्यांनी मुलाची कशीबशी सुटका केली. पण त्यानंतर पुन्हा तृतीयपंथीयांनी या तरुणाचं अपहरण केलं.

तृतीयपंथीयांनी त्या तरुणाला आपल्या डेऱ्यावर घेऊन गेले. तिथे त्याला आपल्या सारखं बनवलं. ते त्याला महिला सारखं बोलणं, चालणं, वागणं एवढंच नाहीतर महिलांची सर्व काम करायला सांगायचे. त्यांच्या दबावानंतर तो महिलांसारखा बोलायचा आणि तृतीयपंथीयांच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा.

या तरुणाने आरोप केलाय की, तृतीयपंथीयांनी एक दिवस आपल्याला बेशुद्ध केलं आणि गुप्तांगाचं आॅपरेशन केलं. त्यानंतर मला पूर्णपणे तृतीयपंथी बनवलं.

पण आता मी तृतीयपंथी नसून एक तरुण आहे असं सांगतोय. त्याने न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. पण पोलिसांनीही या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप या पीडित तरुणाने केला. पोलिसांनी या तरुणांला अनेक वेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं पण कोणतीही तपासणी झाली नाही.

दरम्यान, पीडित तरुणाच्या आईने आपल्या मुलाची बाजू घेत आपला मुलगा हा तरुण आहे. त्याचं नाव आकाश आहे मला एकच मुलगा आहे. माझ्या मुलाला बळजबरीने तृतीयपंथीयांनी आपल्यासारखं बनवलंय. माझ्या मुलाला न्याय मिळावला अशी मागणी पीडित तरुणाच्या आईने केलीये.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.