नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत काही स्थानिक पदाधिकारी काहीही विधाने करतात. असे विधाने करणे बरोबर नाही. त्यामुळे मी सांगतोय ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीचीच जागा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला. 


Loading...
लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार व हा अजितदादाचा शब्द आहे, त्यात बदल होणे नाही, दक्षिण नगर जिल्ह्यात आमचीच ताकद आहे', असाही दावा त्यांनी केला. 'नगरची जागा काँग्रेसला घेणार असल्याचे 'त्यांचे' (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण) वक्तव्य 'त्यांच्या' (डॉ. सुजय विखे) खुशीसाठी केले असाव', अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली.

'काँग्रेस नेते विविध कार्यक्रमातून करीत असलेले दावे पाहता ते लोकसभेच्या ३५ ते ४० जागा लढवण्याचा तयारीत दिसतात', अशी खिल्ली पवार यांनी उडवली. 'याबाबत या नेत्यांशी आम्ही बोललो तेव्हा स्थनिकांना खुश करावे लागते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आम्ही त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेत नाही. 

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, राहुल जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर आदी उपस्थित होते. 

नगर दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पाथर्डी येथे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या समारोपप्रसंगी केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात दोन विधानसभेचे, तर एक विधानपरिषद असे तीन आमदार आहेत. पारनेरमध्ये चांगली परिस्थिती आहे, राहुरीतील चित्र देखील बदलत आहे. अशा परिस्थितीत ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. 

'काँग्रेस नेते विविध कार्यक्रमातून करीत असलेले दावे पाहता ते लोकसभेच्या ३५ ते ४० जागा लढवण्याचा तयारीत दिसतात', अशी खिल्ली पवार यांनी उडवली. 'याबाबत या नेत्यांशी आम्ही बोललो तेव्हा स्थनिकांना खुश करावे लागते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आम्ही त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेत नाही. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.