तलावात बुडून युवकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावात रमेश रोहिदास माळी (वय ४०) या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी रमेश माळी हे मासे पकडण्यासाठी टाकण्यास टयूबच्या सहाय्याने तलावात गेले होते. या वेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. 

Loading...


रात्री स्थानिकांनी मृतदेहाचा शोध घेतला; परंतु त्यात यश आले नाही. रविवार, दि. ३० सप्टेंबर रोजी रमेश माळी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पिंपळगावचे सरपंच संतोष झिने, आदिवासी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. रमेश माळी यांच्यापश्चात दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, शिवनाथ बडे, पवार पुढील तपास करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.