नगराध्यक्ष आमदारकीच्या नादात, नागरिक व्हेंटिलेटरवर !

                                   

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहर मलेरिया, डेंग्यू पाठोपाठ चिकणगुणिया व गोचीड तापाचे आजार झालेल्या रूग्णांची संख्या राहुरीत वाढत आहे. शहरातील जनतेच्या नागरी सुविधांची सोय म्हणून क वर्ग दर्जाची नगर परिषद कार्यरत आहे. मात्र नगराध्यक्ष आमदारकीच्या नादात असल्याने नगर परिषदेचा कारभार रामभरोसे झाला आहे. 
Loading...
आगामी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता गृहित धरून राजकीय पुढाऱ्यांकडून राहुरी मतदारसंघातील ६४ गावात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. राहुरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे देखील उमेदवारीच्या रिंगणात असल्याने त्यांचे नगर परिषदेच्या कामकाजाऐवजी राहुरी मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम वाढले आहे.नगराध्यक्षाचे लक्ष राहिले नाही.

साथीच्या आजारांमुळे राहुरी शहरातील नागरिक व्हेंटिलेटरवर असताना विरोधी पक्षनेते व विरोधी नगरसेवकांची प्रभागातील कामगिरी देखील निष्क्रियतेची ठरली आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नगर परिषदेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांची आहे. मात्र शहरातील नागरी सुविधांची वाताहत पाहता या जबाबदार घटकांनी राहुरीच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

तुंबलेल्या गटारी तुडूंब भरुन रस्त्यावर वाहणारे दूषित पाणी, पिण्याच्या फुटलेल्या पाइपलाइनमधून नागरिकांना नळावाटे मिळत असलेले दूषित पाणी, व्हाॅल्व्हच्या गळतीतील साचलेल्या पाण्याचे डबके, एका जागेवर पडून राहणारा सुका व ओल्या कचऱ्यामुळे डासांचा वाढलेला उपद्रव हा आजाराला निमंत्रण देणारा ठरला आहे. सांडपाण्याच्या गटारी तसेच साचलेल्या डबक्यातील पाण्याचा निचरा होत नसल्याने डेंग्यू व चिकणगुणिया आजाराला निमंत्रण देणारा एडीस डासांच्या पाण्यात अंडी घालण्याचे प्रमाण वाढले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.