कर्जवसुलीसाठी घरी आल्याचा राग आल्याने बँक मॅनेजरला उपसरपंकडून मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी मंजूनाथ रत्ना नायक यांना शुक्रवार दि. २८रोजी सायंकाळी बँकेतून घरी जाताना विनोद सतीश नलगे यांनी मारहाण केली. त्यानंतर शाखाधिकारी नायक हे बेलवंडी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता, बेलवंडी पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

Loading...
रात्री उशिरा कोळगाव सेंट्रल बँक शाखाधिकारी यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर राजाराम लगड व विनोद सतीश नलगे या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण करणे, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आह.

 शाखाधिकारी नायक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२४ सप्टेंबर रोजी नायक व त्यांच्या बँकेचे काही अधिकारी मधुकर लगड यांच्या घरी कर्जवसुलीसाठी गेले असता ते घरी नव्हते, पण कर्जवसुलीसाठी घरी आल्याचा राग आल्यामुळे लगड यांनी शाखाधिकारी नायक यांनी फोनवरून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती.

त्यावेळी नायक यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला लगड यांच्याविरोधात तक्रार दिली होती. शुक्रवार दि.२८रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विनोद सतीश नलगे हा कोळगाव येथील सेंट्रल बँकेत गेला त्याच्या वडिलांच्या नावावर जुने कर्ज असूनसुद्धा तो बँकेकडे नवीन कर्ज मागत होता. त्यावर अधिकारी नायक यांनी जुने कर्ज फेडल्यावर नवीन कर्ज देऊ असे सांगितले.

त्याचा राग आल्यामुळे नलगे याने शाखाधिकारी नायक यांना शिवीगाळ करून धमकावले त्यानंतर सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास नायक हे सहकाऱ्यांसोबत बँकेतून घरी जात असताना विनोद नलगे याने कोळगाव फाट्यावर नायक यांच्या स्विफ्ट कारला दुचाकी आडवी लावून त्यांना काठीने मारहाण करत, परराज्यातून येऊन आमच्या मधूकाका लगडची गाडी ओढून नेणार का, मधूकाकाला कर्जवसुलीसाठी का सतावता. असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.