कांद्याच्या बाजार भावातील उतरती कळा थांबेना.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वांबोरी उपबाजार समितीत शनिवारी १ नंबरच्या कांद्याला ८५० ते १००० रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. दरम्यान, रविवारी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर याच कांद्याचे बाजारभाव १००० रुपये क्विंटल झाल्याने कांद्याच्या बाजार भावातील उतरती कळा अद्याप थांबलेली नाही.

Loading...
राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर गेल्या ३ महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव मातीमोल झाले आहेत. बाजारभावात वाढ होईल या अपेक्षेने उत्पादक शेतकऱ्यांनी गावराण कांदा साठवून ठेवला आहे. कांद्याची आवक कमी तर बाजारभाव जास्त हे समीकरण ओळखले जात असले तरी आवक कमी असतानाही बाजारभाव कमी झाल्याने राहुरीत हे व्यापारी समीकरण बिघडले आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश राज्यात स्थानिक कांदा उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला बाजारात फारसे गिऱ्हाईक नसल्याचा खरेदीदार व्यापाऱ्यांचा सूर आहे. तर आंध्रप्रदेश कर्नाटक या राज्यात नवा कांदा बाजारात दाखल झाला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश मध्ये पाऊस झाल्यास १०० ते २०० रूपये क्विंटलचा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात जुना गावरान कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.