शिर्डी स्मार्ट शहर घोषित करण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी शहराला स्मार्ट शहर म्हणून घोषित करावे, अशी मागणी खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर्षी श्रीसाई बाबा समाधी शताब्दी महोत्सव सुरू असून या माहिन्यात शिर्डी येथे मोठा कार्यक्रम होणार आहे. 
Loading...

या कार्यक्रमात प्रधानमंत्री येणार असून यावेळी शिर्डी स्मार्ट शहर म्हणून घोषित करण्याची विनंती निवेदनात केली आहे. शिर्डी या शहरामध्ये पायाभूत सूविधा चांगल्या आहेत. स्मार्ट शहरांसाठी असणारी लोकसंख्येची अट शिथील करून या शहरास स्मार्ट शहर घोषित करण्यात यावे.

शिर्डी शहरात अखील भारतीय आयुर्विज्ञान चिकित्सा संस्था (एम्स) स्थापन करावे तसेच केंद्र शासनाने लहान शहरात एम्स रूग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असून याच धर्तीवर शिर्डी येथे एम्स रूग्णालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खा.लोखंडे यांनी निवेदनात केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.