सत्ता असो अथवा नसो, तालुक्यात विकासकामांचा प्रयत्न - सुजित झावरे पाटील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सत्ता असो अथवा नसो, तालुक्यात विकासकामे आणण्याचा आपला प्रयत्न आहे, जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपण काम करीत आहोत. असे प्रतिपादन जि.प.चे माज़ी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले. पारनेर तालुक्यातील सारोळा आडवाई येथे सारोळा आडवाई ते जामगाव रस्ताचे भूमिपूजन तसेच जि. प. प्राथ.शाळेच्या संरक्षण भिंतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  
Loading...

सुप्रियाताई झावरे पाटील यांच्या निधीतून या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या वेळी श्री हनुमान भजनी मंडळास भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी सुजित झावरे म्हणाले, जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपण काम करीत आहोत. सत्ता असो अथवा नसो, तालुक्यात विकासकामे आणण्याचा प्रयत्न असून, ते करीत राहणार.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.