अहमदनगर-सोलापूर मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर-सोलापूर मार्गावरील बनपिंप्री शिवारात सोमवारी रात्री झालेल्या टेम्पो आणि दुचाकी यांच्या अपघातात अभिमन्यू वाळके (रा. निमगाव गांगार्डा, ता. कर्जत) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

Loading...
अभिमन्यू वाळके हे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आपल्या दुचाकी( एमएच १६- बीडी-९९८३) वरून अहमदनगरहून घोगरगावच्या दिशेने जात होते. बनपिंप्री शिवारात आले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ( एमएच १६ एवाय २६९५) ने दुचाकीला जोराची धडक दिली. 

या धडकेत वाळके यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. घोगरगावचे पोलिस पाटील सुदाम बोरुडे यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बाजूची वाहतूक खुली करून दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.