मंदिरात चोरी करणाऱ्याला अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर शहरातील सिव्हिल हडको येथील क्रांती चौकातील वैष्णवीमाता मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून तोफखाना पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. सोमनाथ भिकाजी कदम (रा. बुरुडगाव रोड, नगर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. 
Loading...

त्याच्याविरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला. रविवारी पहाटेच्या वेळी वैष्णवीमाता मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा मंदिरात घुसला होता. दानपेटी चोरण्य़ाचा प्रयत्न करत असताना काही नागरिकांनी चोरट्याला पकडले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.