ॲड. आझाद ठुबेंकडून विधानसभेची तयारी पारनेरची जागा लढविणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चात पारनेरचे युवकनेते व माजी जि. प. सदस्य ॲड. आझाद ठुबे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार पुकारत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला. 


Loading...
या वेळी भाकपचे राज्य सेक्रेटरी तुकाराम भसले यांनी पारनेरची जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडणार असल्याचे संकेत देतानाच ही जागा पक्षाचे कॉ. आझाद ठुबे लढणार असल्याचे सांगितले. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, वीजबिल माफ करावे, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाला हमीभाव, मिळावा, काळापैसा, शेतकऱ्यांना पेन्शन व कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. या वेळी ॲड. ठुबे यांनी राष्ट्रीय तसेच राज्यातील भाकपच्या नेत्यांसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. 

याप्रसंगी बोलताना ठुबे म्हणाले, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सुटला नाही तर नागरिकांचे मोठया प्रमाणात स्थलांतर होऊ शकते. जिरायत भागातील वीजपंप पाण्याअभावी बंद असताना सरकारकडून वीजबिल भरण्यासाठी पठाणी वसुली सुरू आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.