सुजय विखेंसाठी नगर दक्षिण जागा राष्ट्रवादीकडे मागणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने पक्षाला नवीन चेहरा मिळत असेल तर राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व मी राष्ट्रवादीकडे आग्रह धरू कारण पंधरा वषांर्पासून राष्ट्रवादीची दक्षिणेची जागा पराभूत होत असेल तर ही जागा राष्ट्रवादीकडे मागितली जाईल. राहुल गांधी यांचे युवकांना संधी देण्याचे धोरण आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.


Loading...
इंदिरा काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेची सांगता सभा मंगळवारी रात्री झाली. या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, आमदार जयकुमार गोरे, सुधीर तांबे, उपस्थित होते. 

तर विखेंना संधी मिळेल !
या वेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, शंकरराव चव्हाण व बाळासाहेब विखे यांचे मैत्रीचे नाते अतुट होते. राज्याच्या राजकारणात या जोडीने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. विखेंची तिसरी पिढी डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने पुढे येत असेल तर विखेंना संधी मिळेल. नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे मागण्यासाठी राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व मी प्रयत्न करू. 

सुजय विखे यांनी काम करत रहावे !
नवीन चेहऱ्यांना व युवकांना संधी देण्याचे काम राहुल गांधी यांनी सुरूकेले आहे. मला व बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे यांना राजीव गांधी यांनी संधी दिली म्हणून आज आम्ही इथे आहोत. समविचारी पक्षांना एकत्रीत करून राज्यात व देशात काँग्रेस पक्षाची व समविचारी पक्षांची सत्ता आणावयाची आहे. तीस टक्के मते मिळविणारी भाजप सत्तेमध्ये आणि सत्तर टक्के मते मिळवूनही मत विभाजनामुळे काँग्रेस व मित्रपक्ष विरोधात आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.