पाचपुतेंच्या कार्यक्रमासाठी अजित पवार काष्टीत येणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सहकारमहर्षि शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ट नेते शिवरामअण्णा पाचपुते यांच्या परिवाराने नगर-दौंड रस्त्याचे बाजूला काष्टीत भव्य रंगोली गारमेंट उभारले आहे. पुण्या-मुंबईच्या धर्तीवर उभारलेल्या अत्याधुनिक सुसज्ज गारमेंटचे उद्‌घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता होणार आहे. 


Loading...
आमदार राहुल जगताप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या वेळी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद काष्टी गटाचे सदस्य सदाशिव पाचपुते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काष्टी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते यांनी केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.