हुंड्यासाठी पेटविलेल्या विवाहितेचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील मान्हेरे येथील जनाबाई प्रकाश गभाले (वय ४८) या विवाहितेस माहेरुन एक लाख रुपये आणावेत म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले होते. उपचार सुरू असताना तीचा मृत्यू झाला. 
Loading...

याप्रकरणी प्रकाश लक्ष्मण गभाले, चंदाबाई लक्ष्मण गभाले, वृषाली गभाले, कमल बाळू गभाले (सर्व रा. मान्हेरे, ता. अकोले) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जनबाई या भाजल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यु झाला. राजूर पोलिसांनी आधी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. 

आता तिच्या मृत्युनंतर वाढीव ३०२ कलम लावले आहे. जनाबाई यांनी मृत्युपूर्वी दिलेल्या जबानीनुसार या चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.