थोरात-विखे हे दोघेही राष्ट्रीय कलावंत - खा.अशोक चव्हाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर जिल्हा हा दिग्गजांचा राजकीय वारसा असलेला जिल्हा आहे. भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब विखे यांचे राज्यात मोठे योगदान आहे. काँग्रेसजणांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या बालेकिल्ल्यात हिच परंपरा बाळासाहेब थोरात राखत आहे. 
Loading...

थोरात-विखे वेळ आली की एकत्र बसतात आणि निर्णय घेतात, हे दोघेही राष्ट्रीय कलावंत आहे. सत्यजीतच्या रुपाने आता नवी पिढी धुरा सांभाळत आहे. ही काळाची जशी प्रक्रिया आहे तशी काँग्रेसला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आगामी चार राज्यातील निवडणुकांत काँग्रेसच सत्तेवर येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 


काँग्रेसची दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रा मंगळवारी संगमनेरमध्ये आली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, माजीमंत्री नसीमखान, माजीमंत्री शोभा बच्छाव, शरद रणपिसे, डॉ. सुजय विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, अण्णासाहेब शेलार, आशिष दुवा, हेमलता पाटील, आमदार हुस्नबानो खलिपे, राजाराम पानगव्हाणे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, शरयु देशमुख, इंद्रजीत थाेरात, रणजितसिंह देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.