एेन सणासुदीत अघोषित भारनियमन सुरू !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एेन सणासुदीत अघोषित भारनियमन सुरू झाले आहेत. राज्यात सध्या सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. महािवतरणने जिल्ह्यात तीन गटांत ३ ते ६ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. सण उत्सवांच्या काळात भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Loading...

याविरोधात आंदोलने करण्यात आली आहे. सध्या राज्याची विजेची मागणी १९ हजार ५०० मेगावॅट आहे आिण पुरवठा १६ ते १७ हजार मेगावॅट होत आहे. दोन ते अडीच हजार मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. यासाठी महाविरतणने भारनियमन करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीत भारनियमन सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणविरोधात नाराजी आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.