आळसामुळे गंभीर आजारांपेक्षाही जास्त मृत्यू होतात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह व एचआयव्हीसारख्या गंभीर आजारांचे नाव ऐकूनच लोकांच्या पोटात गोळा उभा राहतो. कारण या आजारांमुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण या आजारांमुळे जेवढ्या लोकांचा मृत्यू होत नाही, त्याहून जास्त मृत्यू आळसामुळे होतात. हल्लीची जीवनशैली आणि तंत्रज्ञानाने लोकांना आळशी बनविले आहे. 


आळसामुळे जगभरात लाखो लोकांचा जीव जातो. त्याची गणती एचआयव्हीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. अशा लोकांचे जीवन मधुमेह, ह्रदयविकार आणि धूम्रपान करणाऱ्यांपेक्षाही जास्त जोखमीचे आहे. एका ताज्या अध्ययनातून हे समोर आले आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, जे लोक जास्त वेळ बसून वेळ घालवितात, त्यांना सक्रिय लोकांच्या तुलनेत जीवाचा धोका जास्त प्रमाणात असतो. 

जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रसिद्ध या अध्ययनात असे म्हटले आहे की, खराब सवयी व गंभीर आजारांपेक्षा आळसामुळे लोकांचा जास्त मृत्यू होतो. सन १९९१ ते २०१४ यादरम्यान एक लाख २२ हजार लोकांवर हे अध्ययन करण्यात आले. . शास्त्रज्ञांनी या लोकांच्या आजाराचा इतिहास, मृत्यूचे प्रमाण व अन्य आरोग्य स्थितीची तपासणी केली. या अध्यनाचे प्रमुख वेल जॅबर यांनी सांगितले की, ज्या लोकांनी एकही खेळ खेळला नाही, त्यांची सक्रिय लोकांच्या तुलनेत मृत्यू होण्याची जोखीम ५०० टक्के जास्त होती. धूम्रपान, ह्रदयविकार वा लास्ट स्टेजच्या गंभीर आजारांमुळे मरणाऱ्या लोकांपेक्षा ते कितीतरी जास्त होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.