रेल्वेत नोकरी करायची ? तर 'ही' संधी तुमच्यासाठी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तुम्ही जर रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी योग्य संधी आलीये. इस्टर्न रेल्वेनं अप्रेंटशिपसाठी 2,907 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासाठी हावडा, सियालदाह, मालदा, आसनमोल, कंचरपारा, लिलुहा आणि जमालपूर या विभागासाठी जागा काढण्यात येणार आहेत. 


Loading...
इच्छुक उमेदवाराला दहावीमध्ये कमीत-कमी 50 टक्के गूण आवश्यक आहेत. यासोबतच संबंधित ट्रेंडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र गरजेचं आहे.

उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2019 ला 15 ते 24 पर्यंत असले पाहिजे. आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अर्ज भरण्यासाठी एससी, एसटी, अपंगांना विनामुल्य असतील तर खुला प्रवर्ग आणि ओबीसींना 100 रुपये भरावे लागतील. 


अर्ज भरण्यासाठी एससी, एसटी, अपंगांना विनामुल्य असतील तर खुला प्रवर्ग आणि ओबीसींना 100 रुपये भरावे लागतील. www.er.indianrailways.gov.in या संकेतस्थाळाला भेट देऊन यावर ऑनलाईन अप्लाय करू शकता. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.