रेल्वेच्या सिग्नलची तोडफोड करून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या जामखेडच्या टोळीचा पर्दाफाश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील विविध भागात जाऊन रेल्वेच्या सिग्नलची तोडफोड करून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या जामखेड येथील तीन जणांच्या टोळीला नाशिक व सातारा येथील रेल्वे पोलिसांनी जामखेड पोलिसांच्या मदतीने शहरात तीन दिवसापूर्वीच सापळा रचून पकडले. 
Loading...

याप्रकरणी रोहित गोरख राळेभात (वय २४), विनोद सखाराम जाधव (वय ३०) व बापु मोहन कसबे (वय २५ सर्व रा. जामखेड, नगर) हे सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. या टोळीने सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली याठिकाणी चोरी केल्याचे कबुली दिली आहे.

अटकेतील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या व रेल्वे सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या टोळीकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वेमधील २५ ते ३० गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या टोळीतील ३ ते ४ साथीदार पसार झाले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.