श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी व बोरी परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास २ बिबटे व १ बिबट्याचे पिल्लू दिसून आले आहेत. 

गावातील भारत आबा सोनवणे व शंकर बाबासाहेब जठार हे शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतात १ नर बिबट्या व १ मादी बिबट्या तसेच १ बिबट्याचे पिल्लू दिसले असता. त्यांनी या बाबत वनविभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थांना या बाबत माहिती दिली.

या भागात बिबट्या दिसल्याचे समजताच या गावातील शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. तरी वनविभागाने या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अशी या भागातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.