खा.गांधींच्या प्रयत्नांमुळे सारसनगरवासियांना न्याय'


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'सारसनगर परिसरात लोकवस्ती वाढत आहे. मात्र या परिसराचा समावेश भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये असल्याने येथील नागरिकांना खूप त्रास होत होता. हा त्रास कमी करण्यासाठी गेल्या १ वर्षाभरापासून सातत्याने खा.दिलीप गांधी यांच्याकडे पाठपुरावा करुन सारसनगरचा कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत समावेश करण्याची अग्रही मागणी केली.

Loading...
खा.गांधी यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरवठा केला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा.गांधी यांनी हा प्रस्ताव मांडला. पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी या प्रस्तावास मंजुरी देत जिल्हा प्रशासनास तशा सूचना केल्या. त्यामुळे सारसनगर वासीयांच्यावतीने भाजपाचे वकील आघाडीचे अध्यक्ष राहुल रासकर यांनी खा.गांधी यांचे करुन आभार मानले.

यावेळी ॲड. रासकर म्हणाले,या परिसरातील नागरिकांना पोलिसांकडे विविध प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी मोठा हेलपाटा मारुन भिंगार कॅम्पला जावे लागत असे. तसेच घटनास्थळी येण्यास पोलिसांना वेळ लागत असे. त्यामुळे हा परिसर कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी खा.गांधी यांच्या सहकार्यामुळे मंजूर झाली आहे. 

खा.गांधी यांच्या या प्रयत्नामुळे सारसनगर वासीयांना न्याय मिळाला आहे. भविष्यात लवरकच येथे पोलिस चौकी सुरु होईल. याप्रसंगी नगरसेवक सुवेंद्र गांधी, मनोज दुलम, किशोर बोरा, सागर गोरे, गितांजली काळे आदिंसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.