तीन मटका अड्यांवर छापे ; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहर व भिंगारमध्ये पोलिसांनी तीन मटका अड्यांवर छापे टाकत ११ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. आरोपींकडून सुमारे दीड लाखाचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. ६ व ७ सप्टेंबर दरम्यान छापे टाकण्यात आले. पोलिसांना छापा सत्रामुळे अवैध व्यावसायिकांचे पाचावर धारण बसली आहे. 

Loading...
पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, आदींच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. नगर-कल्याण रोडवरील न्यू लकी मेन्स पार्लरच्या शेजारी रमेश उर्फ बिल्लू बोरुडे यांच्या चालू असलेल्या कल्याण मटका अड्यांवर ६ सप्टेंबरला छापा टाकण्यात आला. तेथून ७ हजार २०० रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला. 

याप्रकरणी रमेश उर्फ बिल्लू हरिभाऊ बोरुडे (रा. वारुळाचा मारुती), प्रदीप शंकर चिल्का (शिवाजीनगर), विनोद एकनाथ खंडागळे (रा. व्यंकटेश सोसायटी, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.हे.कॉ. सुयोग सुपेकर, पो. ना. हेमंत खंडागळे, महेश मगर, अभिजीत अरकल, सागर द्वारके यांनी ही कारवाई केली. 

भिंगारच्या मार्केट यार्डजवळील पडक्या जागेत वैभव यशवंत बारकर याचा चालू असलेला मटका उद्धवस्त करण्यात आला. तेथून २२ हजार ६६० रुपयांचा मद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी वैभव यशवंत बारकर (रा. विजय लाईन , भिंगार), गुरुदास बबनराव आदमाने (रा. माधवबाग, भिंगार), आशु रमेश घावरी (रा. भिंगार), सुरेश बाबुराव वाकचौरे (रा. मेहकरी), सचिन मधुकर नवगिरे (रा. भिंगार), आशिर्वाद पवने (रा. भिंगार) यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

तोफखाना हद्दीतील मटका अड्यावरही छापा टाकण्यात आला. कुणाल पोटे याचा मटक्याचा अड्डा होता. तेथून १ लाख १० हजार ९८० रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला. कुणाल महेंद्र पोटे व शिवराज अमरसिंग सावंत या दोघांवर कारवाई करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.