महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नकोच,सेनेचा निर्धार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही कार्यकर्त्याने उमेदवारीसाठी हट्ट धरू नये. आपण शिवसेनेशी एकनिष्ट आहात याची कल्पना स्थानिक नेत्यांसह पक्षश्रेष्ठींना देखील माहीत आहे. असे मत शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी व्यक्त केले. शनिवारी हॉटेल यश पॅलेस येथे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांर्ची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
Loading...

या बैठकीस संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह घुगरे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, महिला संपर्क प्रमुख रिटाताई वाघ, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह नगरसेवक, विविध पदाधिकारी, महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


अहमदनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख कोरगांवकर यांनी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकी दरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्या.

त्यावर संपर्क प्रमुखांनी कोणीही उमेदवारीसाठी हट्ट धरू नका. आपण पक्षाशी एकनिष्ट आहात हे स्थानिक नेत्यासह पक्षश्रेष्ठींनाही माहीत आहे. त्यामुळे केवळ उमेदवारीसाठी हट्ट धरण्यापेक्षा मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता आपण शिवसैनक आहोत. याचा आपण अभिमान बाळगून आपण आपले जास्तीत जास्त उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येतील यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. 

दरम्यान भाजपा युतीबाबत अनेक कार्यकर्त्यांनी नापसंती दर्शवत नगरमध्ये भाजप शिवसेनेसोबत युतीत प्रामाणिक राहत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको असा सुर उमटला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.