जामखेडमध्ये आमदाराच्या सुरक्षा रक्षकाचा कलाकेंद्रात गोंधळ


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बीड जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने जामखेड येथील कला केंद्रात गोंधळ घालून, रिव्हॉल्वर दाखवून दमबाजी केल्याची घटना घडली आहे. बीडच्या एका सत्ताधारी आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने जामखेड येथील कला केंद्रात गोंधळ घातला. 

Loading...
तसेच रिव्हॉल्वर दाखवून दमबाजी केल्याची घटना दि.७ रोजी रात्री घडली आहे. मात्र पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रात्रभर बसवून ठेवले व कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल न करता केवळ चौकशी करून सोडून दिले. या प्रकरणाबाबत जामखेड व बीडमध्ये जोरदार उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

सध्या जामखेड शहरात गोळीबाराच्या सतत घटना घडत आहेत. यात दोन युवकांना जीवही गमवावा लागला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अवैध व्यवसाय, खाजगी सावकारकी यातूनच गुंडगिरी वाढली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अनेक गुन्ह्यातील फरार आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. पोलीस डायरीत ते मात्र फरार आहेत. यातील अनेकजन राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांना लोकप्रतिनिधीच अभय देत आहेत. अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदारपणे सुरू आहे. 

एका सत्ताधारी आमदाराच्या सुरक्षारक्षकाने कलाकेंद्रात धूडगुस घालत रिव्हॉल्वर दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जामखेड पोलिसांनी केवळ चौकशी करून सोडून दिले. खाकीनेच खाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. खाकीचा धाक फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहे का? अशी चर्चा शहरात सुरू आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.