संगमनेरमध्ये आदिवासी महिलेवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारात एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाघापूर शिवारात ही आदिवासी महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.


Loading...
गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महिला घरात एकटी होती. त्याच दरम्यान संदीप दत्तात्रय दिघे याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला आणि आतून कडी लावली. महिलेचे तोंड दाबून तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला आहे. 

याप्रकरणी अत्याचारीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी संदीप दिघे याच्या विरुद्ध गु.र.नं. २९४/२०१८ भादंवि कलम ३७६ अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३,२ (व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात हे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.