मनपा निवडणूक जिंकायची असेल तर कॉग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी हवीच - राधाकृष्ण विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनपा निवडणूक जिंकायची असेल तर कॉग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी हवीच, असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी केले. आघाडीमुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही निश्चितपणे फायदा होईल असा दावाही त्यांनी केला.  


Loading...
दरम्यान ना. विखेंच्या भूमिकेमुळे मनपा निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.  नगर जिल्हा कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा तुषार गार्डनमध्ये शुक्रवारी मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना. विखे यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात कॉँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली. 

ते म्हणाले की, मनपा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसशी अद्यापही चर्चा झालेली नाही. मात्र, आघाडीची गरज आहे. आघाडी झाल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला निश्चितपणे होईल, असे त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकी संदर्भात कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची कुठल्याच प्रकारे चर्चा झालेली नाही. याबाबत लवकरच बैठक होईल असे सुतोवाच त्यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.