सर्जेपुरा परिसरात तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील सर्जेपुरा परिसरातील गोगादेव मंदिराजवळ एका तरुणाला तिघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, सर्जेपुरा परिसरातील गोगादेव मंदिर परिसरात अतुल दिपक शेरगिल हा कामानिमित्त आला होता. त्यावेळी प्रसाद उमल, जय धिवर, विराज शिंदे हे शेरगिलला मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते. यावेळी अतुल याने शिवीगाळ का करता? अशी विचारणा केली असता. तिघांनी त्याला शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. 


Loading...
तसेच तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली. या मारहाणीत अतुल शेरगिल हा गंभीर जखमी झाला. याबाबत अतुल शेरगिल याने दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी प्रसाद उमल, जय धिवर व विराज शिंदे यांचेविरुध्द मारहाणीच्या गुन्ह्यााची नोंद केली असून अधिक तपास पो.ना. पठाण करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

Loading...
--------------------------------

Powered by Blogger.