स्मिता अष्टेकर यांचा एसपी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेच्या नेत्या स्मिता अष्टेकर यांनी आ. कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी शुक्रवारी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 


Loading...
घाटकोपर येथील कार्यक्रमात आ.कदम यांनी मुलींबद्दल अक्षेपार्य वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचा राज्यसभरातून निषेध करण्यात आला.महिलांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्मिता अष्टेकर या शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्या होत्या. 

मात्र आपल्या मागण्यांकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा राग येवून त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत.आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार महिला व मुलींबद्दल असे बेताल वक्तव्य करत असेल तर, यासारखा काळा दिवस नाही असेही यावेळी त्या म्हणाल्या. 


दरम्यान रात्री उशीरा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पीआरओ भाग्यश्री गंगाधर भिटे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात स्मिता अष्टेकर,रा.भिंगार,वैशाली अष्टेकर, रा.रंगारगल्ली अहमदनगर,कमल जाधव रा.भिंगार, कल्पना गुंजाळ रा.भिंगार यांच्या विरोधात आ.राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करवा यासाठी घोषणाबाजी करून,ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत, धमकी देवून, सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.