नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडेच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोकसभा निवडणुकीबाबत आघाडी करण्याचा अंतिम निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवारच घेतील. ही काळ्या दगडावरची रेघ असून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या जागेबाबत माजी आ. पांडुरंग अभंग यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या शब्दाला, मताला अजिबात किंमत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी अभंगांना फटकारले. 

आ. राहुल जगताप यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही स्पष्ट नाराजी व्यक्त करत आ. जगतापांनाही समज दिली जाईल असे काकडे यांनी ठणकावून सांगितले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा नगरमध्ये शुक्रवारी मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर ॲड. काकडे यांनी राष्ट्रवाादी कॉँग्रेसची लोकसभा व मनपा निवडणुकीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली. 

Loading...
ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी नगरची कॉँग्रेसला देण्याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. श्री. अभंग यांना मत मांडण्याचा निश्चितपणे अधिकार आहे. परंतु ते मत चार भिंतीच्या आत म्हणजे पक्षश्रेष्ठींसमोर मांडायला हवे. पक्षाची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणे हे योग्य नाही. अभंग यांनी मांडलेले मत वैयक्तीक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा शब्दांत काकडेंनी माजी आ. पांडुरंग अभंग यांना फटकारले. 

नगरची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडेच आहे. दोन वेळा पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जरी जावे लागत असले तरी पराभवाची कारणे वेगळी आहेत. मतांच्या विभाजनामुळेच फटका बसला असल्याचे त्यांनी स्पष्ट करत नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहील यात दुमत नाही. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार यांचाच राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.