सोमवारपासून पाऊस पुन्हा होणार सक्रिय.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दक्षिण भारतातील मॉन्सूनची तीव्रता कमी झाल्याने पावसाने उघडीप दिली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरल्याने उकडा वाढला आहे. सोमवारपासून कोकणातील काही भागांत हलका पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


Loading...
बंगालच्या उपसागरात झालेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत असून, त्याचे रूपांतर अतितीव्र दाबामध्ये होत आहे.त्यामुळे पुढील काही दिवसांत पश्चिम बंगालसह उत्तराखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मागील पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात किंचित उकाडा तयार झाला आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.