अकोल्यात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील रतनवाडीमध्ये असणाऱ्या कोल्हाटवाडी शाळेच्या इमारतीची भिंत रविवारी पावसामध्ये कोसळली. याच इमारतीमध्ये पहिली ते आठवीपयंर्त एकुण ४४ विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. इमारतीच्या भिंतींना तडे गेले असुन ही सर्व चिमुरडी आणि अध्यापक वर्ग जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करत आहेत.भिंत जरी मागच्या बाजुने कोसळली असली तरी या शाळेच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. इमारतीची भिंत कोसळल्यामुळे इतर वर्गखोल्यांवर दाब येऊन कौले, पत्रे फुटुन गेले आहेत. तर इमारतीची वासेही निखळुन पडले आहेत. रतनवाडीमध्ये पावसाचा जोर बघता कधी इमारत कोसळेल हे सांगता येत नाही. पहिली ते आठवीपयंर्त एकुण ४४ विद्यार्थी या प्राथमिक शाळेमध्ये ज्ञानाचे धडे गिरवत असुन विद्यार्थ्यांची प्रगती अतिशय प्रगतशिल असल्याचे दिसुन येत आहे. 


Loading...
इमारतीमध्ये विज,पाणी आणि भौतिक सुविधांचा अभाव असल्याकारणाने विद्यार्थ्यांना त्याही परिस्थितित शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी चारही खोल्यांचे निर्लेंखन व्हावे असा प्रस्तावही पाठविल्याची माहीती उपलब्ध होत आहे.. आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील ही प्रगतशिल शाळा असुन इमारतीच्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन पंचायत समितीच्या पदाधिकारी वर्गाने सदर शाळेला भेट देऊन शाळेच्या दुरावस्थेबाबत लक्ष घालावे,अशी मागणी रतनवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.