भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील चार वर्षांपासून भाजप सरकार जनतेला फसवत आहे. कर्जमाफी, विमा यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक फडणवीस सरकारने केली, अशी टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली. 


Loading...
शिवपार्वती मंगल कार्यालयात राणा म्हणाले, भाजप सरकारने महागाई वाढवली आहे. ४०० रुपयांचा गॅस ८०० रुपयांवर नेला, डिझेल-पेट्रोलचे दर वाढवले. त्यामुळे आता राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी गट-तट विसरून काम करावे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपण विधानसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासाठी फाळके यांनी माघार घेतली की, जामखेडच्या मधुकर राळेभात यांची सोय करण्यात आली, अशी चर्चा आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.