केडगावच्या युवकांचा मनपावर कंदील मोर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव परिसर व नगर-पुणे महामार्गावरील पथदिवे गेल्या ६ महिन्यांपासून नादुरूस्त होवून बंद पडलेले असून या संदर्भात वारंवार निवेदने देवूनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ केडगावमधील युवकांनी महापालिकेवर गुरूवारी (दि.६) कंदील मोर्चा काढला.. केडगावमधील अजित कोतकर व मनोज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 


Loading...
यामध्ये भाऊ शेंडगे, संदेश शिंदे, कुमार गोफणे, संकेत वाघमारे, सोन्याबापू घेंबुड, ओंकार कोतकर, रणजित ठुबे, अक्षय कोतकर, विवेक मोरे, अभिजित सुपेकर, तुकाराम कोतकर, हर्षल कोतकर, तुषार चौधरी, सौमित्र रासने, सुहास साळुंके, संकेत घोडके, योगेश साळे, अक्षय माखनकर, आकाश शिंदे, ओंकार कोतकर, अक्षय काळे, सादिक शेख, परशुराम मादर, वर्धमान घोडके, योगेश राऊत, योगेश होमले, विशाल तरटे, योगेश भापकर, रोहन माने, आनंद फुलझळके, सुशांत गायकवाड, अमिर सय्यद, तुषार कारंडे आदी सहभागी झाले होते.

केडगांव देवी परिसर, मोहिनीनगर, दूधसागर, आदर्शनगर, शास्त्रीनगर, विद्यानगर, इंदिरानगर, हनुमाननगर, शितल हॉटेल मागील परिसर, लोंढेमळा,कोतकर मळा, कांबळेमळा, तळेवस्ती, कापरेमळा,सोनेवाडी रोड, देवीरोड या परिसरातील अनेक पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. सदर परिसरात पाहणी करून पथदिवे पुर्ववत चालू करावेत. पथदिवे १५ दिवसांच्या आत दुरूस्त होऊन चालू न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने महापालिकेवर मोठया संख्येने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. 


मात्र यावेळी आश्वासन देवूनही त्याची पुर्तता न झाल्याने गुरूवारी (दि.६) दुपारी मनपावर कंदिल मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी शुक्रवार (दि.७) पासून पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.