लग्न करण्यास मुलीने नकार दिल्याने फेक अकाउंटद्वारे बदनामी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लग्न करण्यास मुलीने नकार दिला म्हणून त्या तरुणीच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवत त्याच्यावरून त्या तरुणीला बदनाम करण्याची धमकी देणाऱ्या व तरुणीच्या फोटोचे फ्लेक्स तयार करून गावात लावीन अशी धमकी देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील निकेश सुदाम राऊत या व्यक्तीवर श्रीगोंदा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदयातील एक तरुणी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे शिक्षणासाठी गेली असता तिची निकेष सुदाम राऊत (रा.किरवली, ता. भिवंडी, जि. ठाणे) याच्याशी ओळख झाली होती. सदर इसम या तरुणीला लग्नासाठी आग्रह करत होता परंतु तरुणीने त्याला लग्नास विरोध केला.

त्याचा राग मनात धरुन या व्यक्तीने दि. ३१ ऑगस्ट२०१८ रोजी या तरुणीच्या नावाने चार फेक अकौंट बनवत त्यावर तरुणीचे फोटो अपलोड करण्याची धमकी देत मुलीच्या वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने तयार केलेल्या फेक अकाउंटवर प्रोफाईलला मुलीचे फोटो ठेवून मुलीच्या फोटोचे फ्लेक्स, बॅनर तयार करून तिच्या गावात ते लावण्याची धमकी हा व्यक्ती या मुलीला व तिच्या घरच्यांना देत आहे. 


त्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीमुळे सदर मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निकेश राऊत या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत सांगताना पो.नि. बाजीराव पोवार म्हणाले की, सदर व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपीला अटक करणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.