श्रीगोंद्यात तरुणाकडून विवाहितेवर अत्याचार ; आरोपीस अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील स्पष्ट बोलता न येणाऱ्या विवाहित महिलेवर तरुणाने अत्याचार करण्याची घटना घडली. हा प्रकार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाज़ण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, दि. ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील एका गावातील स्पष्ट बोलता न येणारी विवाहित महिला जनावरे चारत होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कमलेश बापू उगले (वय १८ वर्षे पूर्ण) रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा याने सदर महिलेवर अत्याचार केला व हा प्रकार तू कुणाला सांगितल्यास ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. 


Loading...
पीडित महिला ही बोलताना अडखळत बोलते, तिला स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे तिने झालेला प्रकार हातवारे करून एका नातेवाईक महिलेला सांगितला, त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी कमलेश उगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून बुधवारी उशिरा रात्री आरोपीला अटक केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.