राहुरीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कात्रड (ता. राहुरी) येथील शेतकरी भगवान अंबादास घुगरकर (वय 40) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती व यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकलेले होते. त्यातून आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
Loading...

घुगरकर यांनी काल रात्री घरी नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वांसोबत जेवण केले. सर्वांसोबत ते झोपले. पहाटे पाचच्या सुमारास ते अंथरुणावर नव्हते. त्यांचे वडील अंबादास घुगरकर शेतात पाहण्यासाठी गेले असता ते झाडास लटकलेल्या स्थितीत आढळले. त्यांना वांबोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे बंधू विष्णू घुगरकर यांनी या बाबतची फिर्याद दाखल केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.