कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जबाजारीपणाला कंटाळून शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक अभिजीत सावंत (वय 47) यांनी स्वत: वर काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चांदबिबी महाल येथे गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. सावंत हे त्यांच्यावर आज दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली.मात्र त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. सावंत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रावरून कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करित असल्याचे म्हटले आहे. 

Loading...
काल दुपारी चारच्या सुमारास स्वतः कडील पिस्तूल घेऊन त्यांनी चांदबिबी महाल गाठले. तिथे त्यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराच्या आवाजाने चांदबिबी महालावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सावंत हे रक्ताच्या थोराळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात कोनाचा नामोल्लेख नसून लाखो रूपयांचा कर्ज असल्याचा उल्लेख आहे. 

जयंत मीना म्हणाले, सावंत यांनी स्वतः कडील पिस्तुलातून गोळ्या झाडून घेतल्या आहेत. घटनास्थळी पिस्तूल सापडले असून, काडतुसाच्या रिकाम्या दोन पुंगल्या सापडल्या आहेत. सावंत यांनी हा प्रकार कर्जबाजारीपणातून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुल ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू नगर तालुका पोलिस करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.