प्रभाग मोठे असल्याने मनपा निवडणुकीतील बजेट वाढणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप व शिवसेनेने दोन महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी या दोन्ही पक्षांकडून ‘इनकमिंग’ मोहिम जोरात सुरू आहे. भाजपने 42 प्लसचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘पडद्याआड’ जोरदार तयारी सुरू आहे. त्या तुलनेत कॉंग्रेसच्या गोटात एकदम शांतता आहे. 

Loading...
शिवसेना व भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारी आहेत तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. सावेडी, मुकुंदनगर, सारसनगर, केडगाव, सर्जेपुर्‍यावर राष्ट्रवादीची तर मुकुंदनगर, केडगाववर कॉंग्रेसची भिस्त आहे. 

सावेडी उपनगरासह मध्यशहरावर भाजप, शिवसेनेची भिस्त आहे. दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेने अनेकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे दोन प्रभागांचा पर्याय शोधला जात आहे. एका प्रभागातील संधी हुकली तर दुसर्‍या प्रभागाचा पर्याय ठेवण्यात येत आहे. 

मात्र, यामुळे संभाव्य उमेदवार निश्‍चित करताना पक्षनेत्यांचाही गोंधळ उडाला आहे. खर्चाची धास्ती पुनर्रचनेत प्रभाग भलेमोठे झाले आहेत. प्रभागात नवीन परिसर असल्याने नागरिकांशीही संपर्क नाही. निवडणुकीत नवीन भागात झेंडे वाहण्यासाठी ‘कार्यकर्ते’ शोधण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून जनसंपर्कासाठी दुचाकीवरूनही प्रवास केला जात आहे. 

दुरच्या नातेवाईकांशीही ओळख काढून संपर्क केला जात आहे. प्रभाग मोठा असल्याने प्रभागात अंदाजे 15 ते 16 हजाराच्या आसपास मतदार असणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील बजेट वाढणार आहे. 50 लाखांचा खर्च इच्छुकांकडून गृहीत धरला जात आहे. खर्चाचा मोठा दणका गणेशोत्सवातील वर्गणीत बसणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.