सीना धरणातून शेतीसाठी पाणी सोडले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेतीकरिता सीना धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या आदेशानुसार काल सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान सीना धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.पावसाळयाचे तीन महिने संपले तरी पाऊस नसल्याने सीना धरण लाभक्षेत्रातील ऊस, कपाशी ही पिके व फळबागा धोक्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सीना उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. 


Loading...
या सीना उजव्या कालव्यातून शेती पिका करिता पाणी मिळावे, यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे नेते ॲड. शिवाजीराव अनभुले, कृ. उ. बा. समितीचे संचालक संपत बावडकर, पं. स. सदस्य बाबासाहेब गांगर्डे आदींनी पाठपुरावा केला होता. . सीना धरणातून ५० क्युसेसने उजव्या कालव्याद्वारे शेती पिकाकरिता आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन 'टेल टू हेड' असल्याची माहिती उपविभागीय आधिकारी दिलीप साठे यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.