संस्कार भारती, नगर शाखेच्या 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' कार्यशाळेचा समारोप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संस्कार भारती, अहमदनगर शाखेच्या चित्रकला विभागाच्या वतीने पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा नुकताच समारोप कट्टी-बट्टी या मालिकेतील कलाकार श्री. राजेश दुर्गे, सौ.शोभा दांडगे व बाल कलाकार समृद्धी दुर्गे यांच्या उपस्थितीत माऊली सभागृहाच्या बेसमेंटला करण्यात आला. "संस्कार भारतीचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्यशाळेमुळे नगरच्या सांस्कृतिक वातावरणाला नवी दिशा मिळालेली आहे" अश्या भावना श्री. राजेश दुर्गे यांनी व्यक्त केल्या. 


शोभाताई दांडगे यांनी देखील पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या याप्रसंगी संस्कार भारती, अहमदनगरचे अध्यक्ष श्री. प्रवीण कुलकर्णी व चित्रकला विभाग प्रमुख सुजाता पायमोडे उपस्थित होते. कार्यशाळेत तयार झालेल्या श्रीगणेश मूर्तीची पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली. पर्यावरणपुरक गणपती बनविणे, रंगवणे आणि सजावट करणे इत्यादी गोष्टी या दोन दिवस चाललेल्या कार्यशाळेत शिकविण्यात आल्या. 

दिनांक २२ ऑगस्ट आणि दिनांक २ सप्टेंबर रोजी माऊली सभागृहाच्या बेसमेंट हॉल येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. संस्कार भारतीच्या चित्रकला विभाग प्रमुख आणि कलारंग ड्रॉईंग अकॅडमीच्या संचालिका सुजाता पायमोडे यांनी उत्तमरीतीने मार्गदर्शन केले अशी माहिती संस्कार भारतीचे सचिव श्री. अविनाश कराळे यांनी दिली.

ही नुसतीच गणपती बनवा, रंगवा व सजावट करा याची कार्यशाळा नसून संपूर्ण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून कार्यशाळेत सहभाग घेतलेल्यांच्या घरी केलेली पर्यावरण पूरक सजावट पाहायला निवड समिती येणार आहे. त्यासाठी कार्यशाळेतील सहभागी झालेल्यांनी आपला सविस्तर पत्ता 9850057222 किंवा 9850177042 या नंबरवर व्हॉटस अप करायचा आहे. 

उत्तम पर्यावरणपूरक आरास करणाऱ्या २५ जणांचा विशेष सन्मान एका खास कार्यक्रमात केला जाणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख श्री. आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पर्यावरणावर प्रेम करणारे या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी झाले व पर्यावरणावरील प्रेम दृढ केले आहे, यातच खूप समाधान मिळाले अश्या भावना प्रकल्प प्रमुख सुजाता पायमोडे यांनी व्यक्त केल्या.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री. प्रवीण कुलकर्णी व कार्याध्यक्ष श्री. शिरीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मिहीर पायमोडे, हृषीकेश धर्माधिकारी, प्रसाद सुवर्णपाठकी, अश्विन होशिंग, मृणाल कुलकर्णी, खुशबू पायमोडे, समृद्धी बापट, सौ. दिपाली माळी, दिपक शर्मा, चैत्राली जावळे, धनश्री खरवंडीकर, प्रसाद पुराणिक, अभिजित क्षीरसागर, रवींद्र बारस्कार, विलास बडवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.