चॉंदबीबी महालाजवळ उद्योजकाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरमधील 'सावंत ट्रान्सपोर्ट' या नामांकित फर्मचे संचालक अभिजीत पंढरीनाथ सावंत (वय ४५) यांनी चांदबीबी महाल परिसरात बुधवारी दुपारी गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सावंत यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात मार्केट परिसरामध्ये अभिजीत यांचे सावंत ट्रान्सपोर्ट नावाचे मोठे कार्यालय आहे. नगर जवळील चांदीबीबी महालावर ते साडेतीन वाजण्याच्या सुमाराला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सपोनि. किरण शिंदेंनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 


Loading...
पोलिसांनी सावंत यांना तातडीने नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, शहर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी रुग्णालयात जाऊन सावंत यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.