संगमनेरमध्ये पैशाच्या वादातून सख्ख्या भावांवर शिविगाळ करत सुऱ्याने वार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथिल शिवाजी आरगडे व संजय आरगडे या दोन सख्ख्या भावांवर बुधवारी सकाळी आरोपी सतीष आरगडे याने पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादातून शिविगाळ करत सुऱ्याने वार केल्याची घटना घडली आहे. आरोपी सतीष आरगडे याला आश्वी पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे.


Loading...
याबाबत संभाजी आरगडे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, बुधवारी सकाळी ७.३० वा. सुमारास शिवाजी आरगडे हे घराजवळील डेअरीवर दूध घालत होते. यावेळी सतीष आरगडे हा हातात सुरा घेऊन तेथे आला. व शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 

त्यावेळी शोभा वदक व अजय वदक यांनी तेथे येत मार- मार म्हटल्याने सतीष आरगडे याने शिवाजी आरगडे यांच्या हात, डोके, बरगडी व पाठीवर वार केले. त्यावेळी संजय आरगडे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपी सतीष आरगडे याने संजय आरगडे यांच्या हात, डोके व पोटावर वार केल्यामुळे त्यांचा हात तुटून ते गंभीर जखमी झाले. 


यावेळी संभाजी आरगडे यांनी पाठीमागुन जाऊन सतीष आरगडे यांच्या हातातील सुरा हिसकावून घेत फेकून दिला. त्यामुळे शोभा वदक व अजय वदक यांनी तू सतीषला सोड, त्याला मारु दे असे म्हणत संभाजी आरगडे यांना ओढण्याचा प्रयत्न केला.


यावेळी आरडाओरडा ऐकून अनिता आरगडे, अविनाश आरगडे, सिमा आरगडे, अरुण आरगडे, सुनिल आरगडे, किसन आरगडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे सतीष आरगडे, शोभा वदक व अजय वदक हे गाडी व बॅग तेथेच टाकून निघून गेले. 


यावेळी अरुण आरगडे व सर्जेराव आरगडे यांनी जखमी शिवाजी व संजय आरगडे यांना उपचारासाठी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.