महापालिका निवडणूक हालचालींमध्ये भाजप व सेनेने घेतली आघाडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणूक हालचालींमध्ये भाजप व शिवसेनेने आघाडी घेतली असून दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या गोठात शांतता दिसत आहे. 

Loading...
बुधवारी सकाळी मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बोराटे, कावरे, लोंढे, सप्रे, जाधव, कुलकर्णी यांनी शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजप पाठोपाठ शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजपचे विद्यमान नगरसेवक फोडले असून त्यांचा बुधवारी मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करू घेतला आहे. 

राष्ट्रवादीचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, भाजपचे दत्ता कावरे, कॉंग्रेसचे सुभाष लोंढे, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मनसेचे माजी शहराध्यक्ष गिरीश जाधव व सुमीत कुलकर्णी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरात सुरू झाली असून पक्षाची सत्ता यावे यादृष्टीने विद्यमान मातब्बर नगरसेवकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सर्व पक्षांनी फोडाफोडीचे राजकारण अवलंबविले असून त्यानुसार विविध आमिषे दाखवून प्रसंगी लक्ष्मी दर्शन घडवून पक्षप्रवेश करू घेतला जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.