पाथर्डीतील खून प्रकरण पेटण्याची चिन्हे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कळसपिंप्री खून प्रकरणात विनाकारण गुंतविलेले पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्तींची नावे वगळावीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा तर खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 


Loading...
यामुळे कळसपिंप्री प्रकरण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत. कळसपिंप्री येथील मारामारी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, सरकारी वकील म्हणून उज्ज़्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, गायरान जमीन मयताच्या वारसाला द्यावी, मयताच्या वारसाला शासनाने तीस लाख रुपये मदत द्यावी, नगर जिल्हा आदिवासी अत्याचारग्रस्त जाहीर करावा, जळीत घराचे पुनर्वसन करावे, जखमींना मदत मिळावी, मयताच्या पत्नीला दरमहा पाच हजारांची मदत द्यावी, मयताच्या वारसांना शासकीय नोकरीत समावून घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

९ सस्टेंबर २०१८ पर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर १० सप्टेंबर २०१८ रोज़ी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा शिवाजी ढवळे यांनी दिला आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, शिवप्रहारचे संस्थापक संजीव भोर, संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, शिवाजी हाडोळे, नितीन लवांडे, संजय पाटील, बाळासाहेब पवार यांनी मंगळवारी जिल्हा पोलिसप्रमुखांची नगर येथे भेट घेतली. 


कळसपिंप्री गावातील सरकारी जमीन हडपण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले आहे. मारामारीच्या घटनेशी संबंध नसणारे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्तींवर खून व जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशी करून खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, सरकारची जमीन कोणालाही देऊन नये, खून झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा सखोल तपास व्हावा, 


ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र, विनाकारण अडकविण्यात आलेल्या पदाधिकारी व व्यक्तींची सोडवणूक व्हावी, पोलिस त्यांचे काम करीत आहेत. सरकारी कामात अडथळा आणणारे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू,असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाच्या विविध संघटनांनी दिला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.