वृद्ध महिलेस बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुलांना का रागावले? असा जाब विचारत नगर तालुक्यातील खोसपुरी येथे वृद्ध महिलेस कुऱ्हाडीसह काठ्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिमाबाई गोरख बुधवाले (वय ६५, रा. खोसपुरी) यांना भाऊ बापू देवकर याने मुलांना का रागावले असा जाब विचारत अभिजीत भाऊ देवकर याने महिलेस हातातील कुऱ्हाडीने तसेच लखन शिवाजी देवकर, सागर शिवाजी देवकर, विशाल भाऊ देवकर (सर्व रा. खोसपुरी, ता. नगर) यांनी काठ्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. 

याप्रकरणी भिमाबाई बुधवाले यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहा. फौजदार पालवे हे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.