राहुरीत भरवस्तीत मृतावस्थेत अर्भक आढळले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहरातील भरवस्तीत दि. ३ सप्टेंबर रोजी मठ गल्ली येथील सिन्नरकर यांच्या किराणा दुकान शेजारी कचरा कुंडीजवळ एक अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली होती.
Loading...
राहुरी शहरात एकीकडे गोपाल काल्यानिमित्त कृष्ण जन्म सोहळा साजरी होत असतांना शहरातील मठ गल्ली येथे गणपती घाटकडे जाणाऱ्या रस्त्याला सिन्नरकर यांच्या किराणा दुकान शेजारी एका कचरा कुंडीजवळ सायंकाळी पाच वाजेदरम्यान सुमारे चार ते पाच महिन्याचे अर्भक मृत अवस्थेत पडलेले दिसून आले.

परिसरातील लहान मुले याठिकाणी खेळत असतांना त्यांना सदर अर्भक दिसून आले व त्यांनी मोठ्या लोकांना सांगितले. काही वेळातच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले व सतिष शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


परिसराची पाहणी करून सदर मृत अर्भकाला ताब्यात घेतले व राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे यांनी मृत अर्भकाची तपासणी करुन सदर अर्भक हे चार ते पाच महिन्याचे असून ते स्त्री जातीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.या घटनेबाबत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.